डॉ. रघुराम राजन यांच्यासारखी द्रष्टी, संयत आणि ज्ञानी व्यक्तिमत्त्वे ही जगाला मिळालेली संपत्ती आहे!
‘आय डू व्हॉट आय डू’ हे डॉ. राजन यांचे पुस्तक वाचून त्यांची भावना, तळमळ आणि भारतामधील सामान्य लोकांच्या विकासाबद्दल, भविष्याबद्दल असलेली त्यांची बांधीलकी ही राजकीय सत्तेसाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे, तसेच अर्थतज्ज्ञ किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, याची स्पष्ट जाणीव मात्र त्यातून होते. त्यांच्यासारख्या विचारवंतांचा अधिक्षेप करणे म्हणजे आपला सर्वनाश आपल्याच हाताने घडवून आणण्यासारखे आहे.......